शाळांमधून ‘स्मार्ट फोन’ हद्दपार करा! युनेस्कोच्या अहवालातून जगातील देशांना सल्ला

Unesco : शाळांमध्ये विद्यार्थी स्मार्ट फोनचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. मात्र याच स्मार्ट फोन संदर्भात युनेस्कोने एक अहवाल जारी केला आहे. शाळांमधून स्मार्ट फोन हद्दपार करण्याचा सल्ला युनेस्कोने नव्या अहवालातून जगातील देशांना दिला आहे.
अलिकडे तंत्रज्ञानाच्या साथीने मुलांचं भवितव्य घडवण्याचं काम सुरु आहे. डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो. मात्र, याचा परिणाम विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संवादावर होत असल्याचं मत युनेस्कोनं आपल्या अहवालात मांडलं आहे. युनेस्कोच्या ‘ग्लोबल एज्युकेशन मॉनिटिरग रिपोर्ट’ या अहवालात मुलांकडून लहान वयापासून होत असलेल्या स्मार्टफोन वापरावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा – नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
संयुक्त राष्ट्राची संस्था असलेल्या युनोस्कोने आपल्या अहवालात म्हटलं आहे की, डिजिटल शिक्षणात अफाट क्षमता असली तरी ते शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील प्रत्यक्ष संवादाची जागा घेऊ शकत नाही. कोणतेही तंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. शिक्षण हे मानवकेंद्रीत असायला हवं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोणत्याही प्रकारच्या डिजिटल तंत्रज्ञानाकडे शिक्षणातील सहाय्यक घटक म्हणून पाहायला हवं. अशा भाषेत युनोस्केने आपलं मत मांडले आहे.
डिजिटल शिक्षणाचा फायदा आहे. मात्र, त्यामुळे शिकताना वर्गामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवादामध्ये येणारा व्यत्यय टाळण्यासाठी आणि सायबर गुन्ह्यांपासून विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यासाठी शाळांमधून स्मार्टफोन आणि मोबईलवर बंदी आणली पाहिजे, असं आवाहन युनोस्कोने या अहवालातून जगातील देशांना केलं आहे.





