वेस्ट इंडिजविरूद्धच्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू मायदेशी परतला
![Mohammed Siraj released from ODI squad against West Indies after complaining of sore ankle](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Mohammed-Siraj--780x470.jpg)
Mohammad Siraj : वेस्ट इंडियविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे सामना आज २७ जुलै रोजी खेळला जाणार आहे. दरम्यान या सामन्यापुर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, मोहम्मद सिराजच्या जागी बीसीसीआयने अद्याप घोषणा केलेली नाही.
बीसीसीआयने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये म्हटलं आहे की, मोहम्मद सिराजला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या वनडे संघातून मुक्त करण्यात आले आहे. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाच्या घोट्याला दुखापत झाली आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा – पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! खडकवासला धरण ९७ टक्के भरले
Mohd. Siraj has been released from Team India’s ODI squad ahead of the three-match series against the West Indies. The right-arm pacer has a sore ankle & as a precautionary measure has been advised rest by the BCCI medical team. The team has not called for a replacement player… pic.twitter.com/FrbNCEeya4
— ANI (@ANI) July 27, 2023
मोहम्मद सिराज कसोटी संघाचा भाग असलेल्या आर. आश्विन, के. एस. भरत, अजिक्य रहाणे आणि नवदीप सैनी यांच्यासह मायदेशी परतला आहे. वनडे सामन्यानंतर भारतीय संघाला ५ टी-२० मालिकाही खेळायची आहे. परंतु सिराज टी-२० संघाचा भाग नाही. त्यामुळे तो मायदेशी परतला आहे.