पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! खडकवासला धरण ९७ टक्के भरले
![Khadakwasla Dam is 97 percent full](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Khadakwasla-dam-1-780x470.jpg)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ९५ टक्के पाऊस. मावळ तालुक्यात सर्वाधिक तर पुरंदर तालुक्यात सर्वात कमी पाऊस. सततच्या पावसामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
हेही वाचा – ‘अजित पवार एक ना एक दिवस मुख्यमंत्री होतीलच’; प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान
#खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून #मुठा नदीपात्रात सुरू असलेला ४२८ क्युसेक विसर्ग वाढवून दुपारी ३.०० वाजता ८५६ क्यूसेक करण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी-जिल्हा प्रशासनाचे आवाहन#punerain
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) July 27, 2023
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ९५ टक्के पाऊस. मावळ तालुक्यात सर्वाधिक तर पुरंदर तालुक्यात सर्वात कमी पाऊस.#PuneRain pic.twitter.com/48I4mK9Izs
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) July 27, 2023
खडकवासला धरण परिसरात होणाऱ्या पावसामुळे धरण ९७ टक्के भरले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ होत असून आज संध्याकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान खडकवासला धरणातून ८५६ क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये. वाहने नदीपात्रात लावू नयेत. सखल भागातील नागरिकांना सतर्क रहावे. तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.