महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी
पिंपरी :
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागातंर्गत बालवाड्यांमधील विद्यार्थ्यांना सकस पोषण आहार वाटप करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. नाशिक फाटा उड्डाणपुलावर बस स्थानक बांधणेकरिता येणाऱ्या सुधारित खर्चास आणि पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य रस्ते, महामार्ग, बी. आर. टी, रोड व १८ मीटरपेक्षा मोठ्या रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यास, महापालिकेचे झोनिपू स्थापत्य विभागाकडील सर्व इमारती व शौचालय यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणेकामी तसेच कासारवाडी येथे भाजी मंडई शास्त्री नगर इमारती करिता नवीन वीज मीटर घेणेकामी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांना वीज मिटरची रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, विजयकुमार खोराटे तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मनपाचे प्रभाग क्र. १४ मधील एमआयडिसी व परिसरातील, तसेच प्रभाग क्र. १० मधील मोरवाडी, मोरवाडी गावठाण व औद्योगिक परिसर व इतर परिसरातील रस्त्यांची डांबरीकरणाची कामे करण्यास मान्यता देण्यात आली.
केएसबी चौक ते यशवंतनगर चौक यामधील टेल्को कंपनी लगतच्या रिटेनिंग बॉल बांधणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच प्रभाग क्र. १२ मधील त्रिवेणी नगर चौक ते तळवडे चौकापर्यंत २४ मीटर रस्ता विकसित करणेकामी आणि नदीच्या कडेने जाणारा मंजुर विकास योजनेतील रस्ता विकसित करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.