Breaking-newsराष्ट्रिय

टाटा मोटर्स लवकरच सादर करणार देशी बनावटीची लढाऊ वाहनं

टाटा मोटर्स ही भारताच्या खासगी क्षेत्रातील सुरक्षा भागामधील सर्वात मोठी लँड मोबिलिटी प्लेअर आहे. या कंपनीतर्फे पुण्यात झालेल्या बिम्सटेक नेशन्स समिट २०१८मध्ये, भरपूर प्रमाणात निर्यातीची क्षमता असलेली दोन प्रमुख वाहने सादर करण्यात येतील. ४x४ माइन प्रोटेक्टेड व्हेइकल (एमपीव्ही) आणि द डब्ल्यूएचएपी८x८ आयसीव्ही (ड्रोडोसह संलग्नितपणे विकसित करण्यात आलेली) ही वाहने लष्कर प्रमुख आणि बिम्सटेक नेशन्समधील ४०० पेक्षा जास्त लष्करी अधिकारी यांच्यासमोर सादर करण्यात येतील. या वाहनांमुळे लष्करी श्रेणीतील टाटा मोटर्सची तज्ज्ञता आणि `मेक इन इंडिया फॉर डिफेन्स’ या भारत सरकारच्या पॉलिसीसंबंधातील वचनबद्धता अधोरेखित होणार आहे.

टाटा मोटर्सने अलिकडेच बिम्सटेक नेशन्सबरोबर महत्त्वाच्या लष्करी वाहनांच्या पुरवठ्याचा करार केला, यात टाटा एक्सेनन जीएस ८०० ते म्यानमार, टाटा माइन प्रोटेक्टेड व्हेइकल्‍स फॉर युनिफिल, मोनुस्को अँड माली मिशन्स, टाटा २.५टी एलपीटीए ७१५ ४x४ ते मॅनमार आणि थायलंड, टाटा ५टी जीएस एलपीटीए १६२८ ४x४ ते नेपाळ आणि मिशन स्पेसिफिक लॉजिस्टिक वाहने यूएनच्या शांतता राखण्याच्या मिशनसाठी पाठवण्यात आली आहेत.

या निमित्ताने, टाटा मोटर्स लिमिटेडचे सुरक्षा आणि प्रशासन व्यवसायाचे उपाध्यक्ष श्री. वेर्नन नोरोन्हा म्हणाले की, ‘आमची सुरक्षा वाहतुकीची श्रेणी अधिकाधिक सबळ होत आहे. आम्ही लढाऊ श्रेणीत, सशस्त्र, लढाऊ पाठिंबा देणारी आणि लॉजिस्टिक वाहून नेणारी वाहने पुरवत आहोत, आमची ही श्रेणी लष्कर, सहलष्कर आणि पोलीस दल यांच्या विविध प्रक्रियांच्या वापरासाठी लोकप्रिय ठरली आहेत. आमचे आंतरराष्ट्रीय ग्राहक भारतीय लष्कर दल टाटा लष्कर वाहने वापरते हे जाणून आहेत, खूप कठोर अशा खरेदीपूर्व तपासण्यांनंतर (विविध भूभाग आणि हवामानाची परिस्थती यात अनेक वर्षांपासून घेण्यात येणा-या) या वाहनांना लष्करी दर्जा प्राप्त होतो. यामुळे टाटा मोटर्सने आत्मविश्वासाने परदेशी लष्करांसाठी यांची टिकाऊ आणि सुयोग्य घटकांच्या साहाय्याने उभारणी केली आहे.’

‘टाटा ४x४ माइन प्रोटेक्टेड’ व्हाने (एमपीव्ही) आणि ‘डब्ल्यूएचएपी ८x८ इन्फ्रंट्री कॉम्बॅट व्हेइकल’ पूर्णपणे देशी तज्ज्ञतेअंतर्गत तयार करण्यात आलेले आहे, याद्वारे भारत आणि परदेशातील सुरक्षेसाठी निषेधार्थ आणि लढाऊ प्रक्रियांमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो,’’ असेही ते पुढे म्हणाले.

टाटा मोटर्सचे प्रमुख उत्पादन डब्ल्यूएचएपी८X८ (चाकांवर चिलखत घातलेले सशस्त्र वाहन) हे भारतातील पहिले पायदळातील लढाऊ वाहन आहे, सकारात्मकतेने टिकून राहणे, सर्व भूभागांमधील कामगिरी आणि वाढता बेबनाव आदी मुद्दे लक्षात घेऊन, भारतीय सुरक्षा संशोधन आणि विकास संस्था (ड्रोडो)बरोबर संलग्नितपणे ही निर्मिती करण्यात आली आहे. टाटा मोटर्स हे डब्ल्यूएचएपीची १८ महिन्यांत निर्मिती करणारे भारताच्या खासगी क्षेत्रातील पहिले ओईएम ठरले आहे. हे पूर्णपणे लोडेड वाहन असून यात स्फोटापासून संरक्षण, क्षेपणसामर्थ्यविषयक संरक्षण आणि एनबीसी संरक्षण अशी सुरक्षात्मक वैशिष्ट्ये आहेत. आधुनिकता आणि प्रमाणबद्धता वैशिष्ट्यांमुळे वाहन विविध भूभागांवर कोणत्याही परिस्थितीसाठी आणि कोणत्याही मिशनसाठी सहजपणे बदलता येते, वाहनात १०+२ लोकांची क्षमता आहे,डब्ल्यूएचएपी ८X८ विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, यात सशस्त्र लढाऊ वाहने, इंजिनिअर स्क्वाड वाहने, मोर्टर कॅरियर, कमांडर वाहने आणि अँटी-टँक मार्गदर्शन मिसाइल वाहने यांचा समावेश आहे.

४X४ काँन्फिगरेशनसह येणारे माइन प्रोटेक्टेड वाहन (एमपीव्ही) माइन प्रूफ ट्रूपच्या वाहतुकीसाठी खास तयार करण्यात आले आहे, हे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी खास प्रतिसाद देणारे वाहन असून ते हल्ल्याच्या निषेधार्थ वापरले जाईल, किंवा एस्कॉर्ट प्रोटेक्शन वाहन म्हणून वापरले जाईल. हे वाहन विस्तारीत देशभरातील वाहतुकीसाठी सर्वोत्तम अशा ग्राउंड क्लिअरन्स सह येते. याच्या वजनासाठीच्या उच्चतम क्षमतेच्या प्रमाणामुळे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये विस्तारीत चालना देणे आणि जास्तीत-जास्त गतीने अधिक जलद प्रतिसाद देणे शक्य होते.

टाटा मोटर्सची भारतीय लष्कर दलाबरोबर १९५८ सालापासून भागीदारी आहे, आणि ती निश्चितच अभिमानास्पद आहे. आतापर्यंत भारतीय लष्कर, सह-लष्कर आणि पोलीस दलाला दीड लाख वाहने पुरवण्यात आली आहेत. टाटा मोटर्स ही सार्क, एएसईएएन आणि आफ्रिकेच्या प्रदेशातील सुरक्षा उपाययोजना देणारी अग्रणीची पुरवठादार कंपनी आहे. याबरोबरच कंपनीने यूएनच्या शांतता राखण्याच्या मिशन्समधील विशेष पुरवठादार म्हणूनही नाव कमावले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button