सोशल मीडियावर हिंदू धर्माचे देव देवतांचे आक्षेपार्ह फोटो प्रसारित केल्याने १२ जणांवर गुन्हा दाखल
![A case has been registered against 12 people for circulating offensive photos of Hindu Gods on social media](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/social-media-780x470.jpg)
पुणे : सोशल मीडियावर हिंदू धर्माचे देव देवतांचे आक्षेपार्ह फोटो इंस्टाग्राम ॲपवर प्रसारित करून, हिंदू समाजाच्या भावना दुखावून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केल्याप्रकरणी १२ इंस्टाग्राम आयडी धारक वापरकर्त्यांविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार १० ते १३ जुलै या दरम्यान घडलेला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सत्यजित फुले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित वेगवेगळ्या १२ इंस्टाग्राम आयडी धारक आणि वापरकर्त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम आयडीवरून वारंवार हिंदू धर्माचे देव देवतांचे आक्षेपार्ह फोटो प्रसारित करून हिंदू समाजाच्या भावना दुखावून तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे याप्रकरणी संबंधित आरोपींवर भारतीय दंड विधानसहिता कलम १५३, २९५, ५००, ५५२ आयटी अॅक्ट ६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गुन्हे एस शिवले याबाबत पुढील तपास करत आहे.
हेही वाचा – श्रावणाच्या आधी गटारी का साजरी करतात? नेमकं कारण काय?
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व माता रमाई यांच्या विषयी अश्लील भाषेत टीका टिपणी केल्याने फेसबुक आयडी धारक कृष्णाबुक आर याच्या विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. याप्रकरणी दिलीप कमलाकर क्षेत्रे (राहणार – हडपसर, पुणे) यांनी संबंधित आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.