‘..तर प्रतिभाआजींना हा प्रश्न विचारला पाहिजे’; रोहित पवारांचं अजितदादांना प्रत्युत्तर
![Rohit Pawar said that this question should be asked to Pratibha Aji](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/ajit-pawar-and-rohit-pawar-780x470.jpg)
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यानंतर त्यांनी थेट शरद पवार यांना लक्ष केलं. कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा अपराध आहे का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. दरम्यान, अजित पवार यांच्या प्रश्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
रोहित पवार म्हणाले की, कधी संधी मिळाली, तर प्रतिभाआजींना हा प्रश्न विचारला पाहिजे, अजित पवार असे बोलले आहेत. तुन्हाला काय वाटते. राहिला प्रश्न कुठे जन्मायचा. तर माझे आई-वडील आणि आजोबाही राजकारणात नव्हते. तर, मी काय करायचं?
हेही वाचा – अध्यक्षपदाबाबत अजितदादांच्या हातून घडली मोठी चूक? दादांच्या अडचणी वाढणार
अजित पवार यांच्यात खूप मोठी क्षमता आहे. पण, भाजपाला कधीही लोकनेते चालत नाहीत. एकनाथ शिंदे यांचा एक वर्षात गेम होईल, असे वाटते आहे. भाजपाला त्यांच्या पक्षातील आणि बाहेरचेही लोकनेते आवडत नाहीत. ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असतो. त्यामुळे घडत असलेले एक लोकनेता भाजपामुळे संपण्याची भीती वाटते, असं रोहित पवार म्हणाले.
गेली तीन-चार वर्षे भाजपाशी संवाद सुरू होता, असं अजितदादा म्हणाले. याचा अर्थ चार वर्षापासून भाजपाबरोबर जाण्याचं अनेकांच्या मनात होते. सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड आता झाली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे हे बाहेर जाण्याचं कारण होऊ शकत नाही, अंसही रोहित पवार म्हणाले.