Adipurush : आदिपुरूषने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी, आकडा पाहा..
![Adipurush earned so many crores on the first day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/adhipurush-780x470.jpg)
Adipurush Box Office Collection : बहुप्रतीक्षित ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट अखेर १६ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर रॅलीज झाल्यापासून या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. या चर्चेमुळेच या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा दमदार झाल्याचं पाहायला मिळालं.
हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये तर तब्बल ६,२०० स्क्रीन्सवर २ डी आणि ३ डीमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो अनेक सिनेमागृहात हाऊसफुल्ल झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कमाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आदिपुरूष या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवक धुमाकुळ घातल आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक विक्रम रचले आहेत. या सिनेमाने पहिल्या दिवशी तब्बल ८५ ते ९० कोटींची कमाई केली आहे. पण हे आकडे अंदाजे आहेत. यामध्ये रात्रीच्या शोचा समावेश नाही, असं एनडीटीव्हीने म्हटलं आहे.
हेही वाचा – ‘..तर शरद पवार पंतप्रधान झाले असते’; राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षांचा दावा
या चित्रपटाला बॉलिवूडसह दाक्षिणात्य कलाकारांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. या कलाकारांनी बरीच तिकिटं विकत घेतली आहेत आणि ती गरीबांना वाटली आहेत. रणबीर कपूरनेही चित्रपटाची १० हजार तिकिटं खरेदी केली आहेत. आता हा चित्रपट किती कमाई करतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘आदिपुरुष’ या सिनेमात प्रभास रामाच्या आणि क्रिती सेनन सीता मातेच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान रावणाच्या, सनी सिंह लक्ष्मणाच्या आणि मराठमोळा देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे. सोनल चौहान आणि तृप्ती तोरदमल देखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.