Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

शरद पवारांनी दिल्लीमधून भाकरी फिरवली; सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. त्यानंतर शरद पवार अध्यक्ष आणि सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्ष करावेत अशी चर्चाही सुरू झाली होती. मात्र, या सर्व चर्चांना पवारांनी पूर्णविराम दिला होता. त्यानंतर आज शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दोन नेत्यांची नियुक्ती केली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्रासह हरियाणा आणि पंजाबची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा – प्रदीप कुरुलकर यांच्यावर देशद्रोह आणि दहशतवादी कलम अंतर्गत कारवाईची मागणी

प्रफुल्ल पटेल – मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी दिली आहे.

सुप्रिया सुळे – महाराष्ट्र, हरयाणा, पंजाब, महिला, युवक-युवती आणि लोकसभा निवडणूक नियोजनाची जबाबदारी दिली आहे.

सुनील तटकरे – ओडिशा, पश्चिम बंगाल आणि राष्ट्रीय समितीची सत्र, परिषदा, निवडणूक आयोगाच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, अल्पसंख्याक विभाग या जबाबदाऱ्या

डॉ. योगानंद शास्त्री – दिल्ली सेलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी

के. के. शर्मा – उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंचायत राज विभाग

फैजल – तामिळनाडू, तेलंगणा, केरळ

नरेंद्र वानवा – सर्व पूर्वेकडची राज्ये, आयटी विभाग

जितेंद्र आव्हाड – बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, लेबर विभाग, एससी, एनटी, ओबीसी विभाग

नसीम सिद्दिकी – उत्तर प्रदेश, बिहार, गोवा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group