Shubman Gill : सारा अली खान ना सारा तेंडुलकर शुभमन गिलची ‘ही’ आहे क्रश
![Shubman Gill's South Actress Crush](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/shubman-gill-780x470.jpg)
Shubman Gill : यंदाच्या आयपीएलमध्ये धुवादार कामगिरी करणारा गुजरात टायटन्स संघाचा फलंदाज शुबमन गिल चांगलाच चर्चेत आहे. यासहच त्याच्या लव्ह लाईफमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शुबमन गिलचं नाव सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर हिच्याशी जोडलं जात आहे. त्यानंतर अभिनेत्री सारा अली खान सोबत जोडलं जात आहे. अशातर आता शुबमनने आपल्या क्रश बद्दल सांगितलं आहे.
सारा अली खानला आणि शुबमन गिल बर्याचदा एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. त्यामुळे त्या दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरू होत्या. पण काही दिवसांपूर्वीच सारा आणि शुबमनने एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्यामुळे त्या दोघांच्या डेटींगच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. दरम्यान एका मुलाखतीत शुबमनने सारा अली खानला डेट करत नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता त्याचं नाव एका साऊथ अभिनेत्रीशी जोडलं जात आहे.
हेही वाचा – ‘पुणे तिथे काय उणे!’ एकाच दिवशी ५१ जणांचा वाढदिवस साजरा
सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आहे. एका मुलाखतीत शुबमन गिलने त्याच्या क्रमशबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर एक गोड अशी स्माईल दिली. त्यावेळी तो म्हणाला की त्याची क्रश साऊथची रश्मिका मंदाना आहे. त्यामुळे रश्मिका नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचे आहे.