‘महाराष्ट्र शाहीर’ ओटीटीवर रिलीज होणार, ‘या’ ठिकाणी पाहता येणार
![Maharashtra Shaheer will release on OTT on June 2](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Maharashtra-Shaheer-780x470.jpg)
मुंबई : शाहीर साबळे यांचा जीवनप्रवास उलगडणारा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट ३० एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता लवकरच हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे.
‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २ जूनपासून ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. याबाबत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
हेही वाचा – पुण्यातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली दखल; म्हणाले..
‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. या चित्रपटात अंकुश चौधरीने शाहीर साबळेंची भूमिका साकारली आहे. तर केदार शिंदे यांनी लेक सना शिंदे हिने शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती साबळे यांची भूमिका साकारली आहे.