शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने थोपटले दंड?
पुणे : शिरूर लोकसभा मदरासंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याची चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू आहे. विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबरोबरच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या भोसरीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचे पोस्टर्स पाहायला मिळत आहेत.
शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचाच नेत्याने दंड थोरटले आहेत. शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. आमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लागले आहेत. विलास लांडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिरूर लोकसभा मतदारसंघात लांडेचं शक्ती प्रदर्शन पाहयला मिळत आहे.
हेही वाचा – महिन्याच्या सुरवातीलादिलासा; LPG गॅस सिलेंडर ८३ रुपयांनी स्वस्त
शिरूर मतदारसंघात लांडेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर भावी खासदार असं लिहलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचाच नेता अमोल कोल्हे यांच्या विरोधात दंड थोपटताना दिसत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.