breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

महिन्याच्या सुरवातीलादिलासा; LPG गॅस सिलेंडर ८३ रुपयांनी स्वस्त

LPG Cylinder Price : एलपीजी गॅसच्या किमतींत मोठी घट झाली आहे. नवी दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत ८३.५ रुपयांनी कमी झाली असून ती आता १७७३ रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर पूर्वीप्रमाणेच आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

घरगुती गॅस सिलेंडरचा दर ११०३ रुपयांवर कायम आहे. मुंबईत व्यावसायिक गॅस ८३.५० रुपयांनी स्वस्त झाला असून १८०८.५० रुपयांवरून १७२५ रुपयांवर येऊन पोहोचला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे नवे दर १ जूनपासून लागू झाले आहेत.

हेही वाचा – ‘देशातील हिंदू समाजाच्या मंदिरांमध्ये स्वच्छता नसते’; नितीन गडकरींचं विधान चर्चेत

जाणून घ्या कुठे झाला स्वस्त सिलिंडर

कोलकतामध्ये सिलिंडर ८५ रूपयांनी स्वस्त झाला असून, तो आता १९६०.५० रूपयांवरून १८७५.५० रूपयांवर आला आहे.

मुंबईत तो ८३.५० रूपयांनी स्वस्त होऊन १८०८.५ रूपयांवरून १७२५ रूपयांवर झाला आहे.

चेन्नईमध्ये तो ८४.५० रूपयांनी स्वस्त होऊन २०२१.५० रूपयांवरून १९३७ रूपयांवर आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button