कुस्तीपटूंचं जंतरमंतवर सुरू असलेलं आंदोलन हटवले, फोगाट बहिणींना घेतलं ताब्यात
![Wrestlers' agitation at Jantarmant canceled, Phogat sisters taken into custody](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/jantar-mantar-1-780x470.jpg)
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं. तर दुसरीकडं विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांच्यासह कुस्तीपटूंचं जंतरमंतवर सुरू असलेलं आंदोलन दिल्ली पोलिसांनी पूर्णपणे हाटवलं आहे. गेले ३६ दिवस हे आंदोलन सुरू होतं. सुरक्षेचं कारण देत पोलिसांना कुस्तीपटूंना ताब्यत घेतलं आहे. यावेळी पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी कुस्तीपटूंचे जंतर-मंतर मैदानावरील तंबूही हटवले आहेत.
विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह आंदोलक कुस्तीपटू जंतरमंतरहून नव्या संसदेच्या दिशेने जाण्यासाठी जात असताना पोलीस आणि त्यांच्यात झटापट झाली. नव्या संसदेसमोर महिला सन्मान महापंचायत आयोजित करण्याचा आंदोलक कुस्तीपटूंचा प्रयत्न होता.
हेही वाचा – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची संसद भवन सोहळ्यावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/jantar-mantar-1024x576.jpg)
कुस्तीपटू साक्षी मलिकने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात पोलीस बळाचा वापर संगीता फोगाट आणि विनेश फोगाट हिला गाडीत बसण्याचा प्रयत्न करत आहेत. तिच्या हातात भारतीय ध्वज तिरंगाही दिसत आहे. ट्वीटवर साक्षी मलिकने लिहलं की, आपल्या खेळाडूंना अशी वागणूक दिली जात असून, जग सगळं पाहत आहे.
एखादं सरकार आपल्या खेळाडूंबरोबर असं वागतं का? आम्ही काय गुन्हा केला आहे, असा सवाल बजरंग पुनियाने उपस्थित केला आहे.