उर्से टोल नाक्याजवळ मुंबईवरून पुण्याला येताना भीषण अपघात, एका मुलीचा मृत्यू
![Near Urse Toll Pass, Mumbai, Pune, fatal accident, one girl died](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/urse-accident-780x470.png)
पुणे : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे साडे तीनच्या सुमारास उर्से टोल नाक्याजवळ मुंबईवरून पुण्याला येताना एका कारने आयशर मागून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, या कारमध्ये असणाऱ्या सहा प्रवासींपैकी एका १३ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर झाले आहेत आणि इतर तीन किरकोळ जखमी झाले आहेत. मुंबई – पुणे महामार्गावर अतिवेगाचा पुन्हा एकदा बळी गेल्याचं पाहायला मिळालं आहे.
घटनास्थळी आय.आर. बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस आणि राणी रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना उपचारासाठी पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कारचा पुढील भागचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. उर्से टोल नाक्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवरून पुण्याच्या दिशेने कार येत होती. रस्त्यावर वाहनांची गर्दी नसल्याने वाहने वेगाने जात होती. अपघात झालेला कार चालक देखील आपली काल वेगात चालवत होता. त्यामुळे समोर चाललेल्या आयशर या कारने मागून जोरदार धडक दिल्याने कार आयशरच्या मागच्या बाजूला अडकली. कारमध्ये असणाऱ्या व्यक्तींना काही कळायच्या आत ही घटना घडली. या कारमध्ये प्रवास करत असणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
एक्स्प्रेस वेवर अपघातांचे प्रमाण वाढत असून अतिवेगाने नागरिकांचे बळी जात आहेत. आज पहाटे घडलेला अपघातात हा कार चालकाचा अतिवेग असल्याचे प्रथमदर्शनी समोर आलं आहे.