दुचाकी चोरट्याला पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट ४ ने केली अटक; ११ दुचाकी जप्त
![Two-wheeler thief, Pimpri-Chinchwad, Crime Branch, Unit 4, arrested; 11 bikes seized,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Bike-Theft-780x470.png)
पिंपरी : दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट ४ ने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून पाच लाख दहा हजारांच्या ११ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. सात गुन्हे देखील उघडकीस झाले आहेत. राहुल दगडू शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. तो सराईत गुन्हेगार असल्याचे देखील समोर आले आहे. सराईत गुन्हेगार राहुल दगडू शिंदे याला ताब्यात घेऊन लपवून ठेवलेल्या आणि विकलेल्या ११ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. राहुल दगडू शिंदे हा सराईत गुन्हेगार असून, या अगोदर देखील त्याच्यावर दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपी राहुल हा पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांच्या हद्दीतून दुचाकी चोरत होता. तो इतर ठिकाणी कमी किमतीत या चोरलेल्या दुचाकी विकत असे. आरोपीने आतापर्यंत अनेक दुचाकी चोरल्या असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सध्या तरी त्याच्याकडून ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय गुन्हे स्वप्ना गोरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, दादा पवार, नारायण जाधव, संजय गवारे, पोलीस हवालदार रोहिदास आडे, तुषार शेटे, मोहम्मदगौस रफिक नदाफ, पोलीस नाईक वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, पोलीस शिपाई धनाजी शिंदे, गोंविद चव्हाण, सुखदेव गावंडे यांनी केली आहे.