स्ट्रॉबेरी बघून शेती होते का? अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला
![Ajit Pawar said whether agriculture is done by looking at strawberries](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/eknath-shinde-and-ajit-pawar-780x470.jpg)
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते साताऱ्यातील कोरेगाव येथे बाजार समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी स्ट्रॉबेरी बघून शेती होते का? असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगवला.
अजित पवार म्हणाले की, काय झालं की मुख्यमंत्री साताऱ्यात दोन, तीन दिवस इथे येऊन राहतात. काय करता तर शेती करतोय. स्टॉबेरी पाहून कधी शेती होती का? असा प्रश्न करून कधी झाडं बघायचे तर कधी आणखी काय..अशा शब्दात अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची टिंगल उडवली.
हेही पाहा – ‘संजय राऊतची अवस्था कुत्र्यासारखी’; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
लोक विचारतात कशाला गेलेत. मग त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात येते फाईल काढायला गेलेत अन् फाईल काढून काढून किती काढल्या तर ६५, आम्ही दोन तीन तासांत इतक्या फाईल काढतो, असंही अजित पवार म्हणाले.