Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

राष्ट्रवादीच्या एका गटामुळे राज्यात कधीही भूकंप होईल! ठाकरे गटाचा दावा

अजित पवार व त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचीच जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी पुनर्विचार करण्यासाठी २-३ दिवसांचा वेळ मागितला आहे. दरम्यान, यावर आता शिवसेना ठाकरे गटाने खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या समानातील अग्रलेखातून करण्यात आला आहे.

शरद पवारांनी त्यांचे भाषण लिहून आणले होते. असे कधी होत नाही. म्हणजे त्यांच्या भावनिक आवाहनाचा व राजीनाम्याचा मसुदा त्यांनी काळजीपूर्वक तयार करून आणला होता व त्यानुसार त्यांनी सर्व काही केले. पवारांनी निवृत्तीची घोषणा करताचा अनेक प्रमुख नेत्यांनी अश्रू ढाळले, आकांत केला. पवारांच्या चरणाशी लोळण घेतली. तुमच्याशिवाय आम्ही कोण? कसे? अशी विलापी भाषा केली. पण यापैकी अनेकांचा एक पाय भाजपात आहे व पक्ष अशा तऱ्हेने फुटलेला बघण्यापेक्षा सन्मानाने निवृत्ती घ्यावी असा सेक्युलर विचार पवारांच्या मनात आला असेल तर त्यात चुकीचे नाही, असं सामनातून म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे व राज्याच्या राजकारणात कधीही कोणता भूकंप होऊ शकतो असे वातावरण असताना पवारांनी राजीनामा देऊन धरणीकंप घडवला. पक्षातील ईडी सारख्या तपास यंत्रणांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता व त्या अस्वस्थतेतून सहकाऱ्यांनी निवडलेला भाजपचा मार्ग हे कारण राजीनाम्यात आहे काय? असा सवालही सामनातून उपस्थित केला आहे.

दुसरे म्हणजे, अजित पवार व त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले आहे काय? शिवसेना फुटली. चाळीस आमदार सोडून गेले, पण संघटना व पक्ष जागेवरच आहे. उद्या राष्ट्रवादीचे काही आमदार वगैरे गेले तरी जिल्हा स्तरावरील फळी आपल्याला मागे राहावी यादृष्टीने जनमनस तपासण्याचा हा एक धक्का प्रयोग असू शकतो, असंही सामनाच्या अग्रलेखातून नमूद करण्यात आला आहे.

राज्यातील अनेक नेते आज कुंपणावर आहेत व त्यातील अनेक नावे पवारांच्या पक्षातली आहेत. याच कुंपणावरच्या काही नेत्यांनी पवारांच्या राजीनाम्यानंतर सगळ्यात जास्त विलाप केला. शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सगळ्यांना उघडे केले. आज जे पायाशी पडले तेच उद्या पाय खेचणार असतील तर त्यांचे मुखवटे ओरबाडून काढले, असा दावा सामनातून करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button