TOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारणराष्ट्रिय

एप्रिल महिन्यात २८ हजार १६७ जणांनी केला विना तिकीट प्रवास करताना, पुणे रेल्वे विभागाची कारवाई

पुणेः

पुणे रेल्वे विभागात एप्रिल महिन्यात तिकीट तपासणी दरम्यान २८ हजार १६७ लोक विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून २ कोटी २९ लाख २२ हज़ार रुपये दंड वसूल करण्यात आला. पुणे रेल्वे विभागाने ही कारवाई केली आहे.

या कारवाईमध्ये फुकट्या प्रवाशांबरोबरच ८ हजार ५८९ जणांना अनियमित प्रवासासाठी ५० लाख ६९ हज़ार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या २०६ जणांकडून २१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, त्यामुळे खबरदारी घ्यावी, असे पुणे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button