breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय
वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर! दिल्ली, मुंबई या क्रमांकावर
पुणे : पुणेकरांसाठी वाहतुक कोंडी ही एक मोठी समस्या बनली आहे. दरम्यान, याची दखल आता जागतिक स्थरावर घेतली गेली आहे. जागतिक वाहतूक कोंडीत पुणे शहर जगात सहाव्या क्रमांकांवर असल्याचं एका अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही एक आश्चर्याची बाब आहे.
देशातील जगभरातील मोठ्या शहरातील वाहतूक कोंडीचा सर्वे एका खासगी संस्थेना जाहीर केला आहे. टॉम टॉम असं या कंपनीचं नाव आहे. यामध्ये बंगळुरू आणि पुण्याचा समावेश आहे. या अहवालानुसार बंगळूरू जगात दुसऱ्या स्थानावर आहे तर पुणे सहाव्या स्थानी आहे. तर नवी दिल्ली ३४, मुंबई ४७ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या अहवालानुसार, पुणे शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याचे आणि वाहतूक कोंडीचे चित्र स्पष्ट होत आहे.