प्रत्येक स्त्रीने आपला मार्ग स्वतः शोधला पाहिजे: अलका कुबल
स्वदेशी मेला - धागा' या प्रदर्शनाचे उदघाटन उत्साहात
![Every woman must find her own way, Alka Kubal,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/pcmc-12-780x470.png)
पुणे: सूक्ष्म, लघु उद्योग तसेच महिला उद्योजकांना प्रोत्साहन आणि आत्मविश्वास, आत्मनिर्भरता करिता महिला उद्योजिकांना स्वावलंबी करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन मेधा कुलकर्णी यांनी केले.
अक्षय तृतीयाचे औचित्य साधून महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्वदेशी मेला – धागा’ प्रदर्शनाचे उद्घाटन मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल, दीपक करंदीकर ( अध्यक्ष, एम.सी.सी.आय.ए), अभय दफ्तरदार (सहाय्यक संचालक, एम.एस.एम.ई डी.एफ.ओ, मुंबई), नरेंद्र इस्टोलकर, वर्षा कुलकर्णी व महोत्सवाचे आयोजन प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी, माजी आमदार उपाध्यक्ष, राष्ट्रीय महिला मोर्चा, भाजपा यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
अभय दफ्तरदार सहाय्यक संचालक, एम.एस.एम.ई डी.एफ.ओ, मुंबई हे म्हणाले की सूक्ष्म, लघु उद्योग मंत्रालयाच्या वतीने महिलांच्या हितासाठी अनेक योजना आहेत. १ करोड पासून ५० करोड पर्यंत रक्कमेचा उद्योगासाठी लाभ घेता येईल. कोरोनाच्या काळानंतर उद्योग क्षेत्रात मोठया प्रमाणावर उद्योगिक क्रांती झाली आहे.
अलका कुबल म्हणाल्या की ग्रामीण भागात ट्यूरिंग टॉकीजच्या माध्यमातून मी चित्रपटांचे प्रमोशन करत आले आहे. यातूनच गेली अनेक वर्षे मी उद्योग क्षेत्रात कार्यरत आहे. त्या पुढे म्हणाल्या की प्रत्येक आपली कला आपण वाढवावी जोपासावी. प्रत्येक स्त्रीने आपला मार्ग
स्वतः शोधला पाहिजे. त्याच बरोबर अलका कुबल यांनी माहेरची साडी चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
मेधा कुलकर्णी या प्रसंगी म्हणाल्या की हे प्रदर्शन व विक्री दि. २२ ते २३ एप्रिल २०२३ वेळ : स. ९ ते रात्री ९ स्थळ : केशवबाग, डी. पी रोड, राजाराम पूलाजवळ, कर्वेनगर, पुणे या ठिकाणी होणार आहे. यात विविध कलाकुसरीच्या वस्तू, साड्या, ड्रेस मटेरियल, रेडीमेड्स, खाद्य पदार्थ यांची रेलचेल असणार आहे. पुणेकर नागरिकांनी सणाचा आनंद आणि सुट्टीची मजा लुटण्यासाठी या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी आणि भरपूर खरेदी करून उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन माजी आमदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी केले आहे.
उद्योग क्षेत्रात महिलांचे योगदान मोठे: करंदीकर
उद्योग क्षेत्रात महिलांचे योगदान मोठे आहे. महिला प्रत्येकात क्षेत्रात कार्यरत आहेत तसेच वेळोवेळी आम्ही मराठा चेम्बर ऑफ कॉमर्सच्या वतीने मार्गदर्शन करत आहोत. असे दीपक करंदीकर यांची मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स अध्यक्ष यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले.