Breaking-newsराष्ट्रिय

तेलंगणामध्ये बस उलटल्याने भीषण अपघात, 45 प्रवासी ठार

तेलंगणामध्ये बसचा भीषण अपघात झाला आहे. येथील जगतियाल जिल्ह्यातील कोंडागट्टू घाटात राज्य परिवहन महामंडळाची बस उलटल्याने हा अपघात झाला. यामध्ये 45 प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, तर 18 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळावर पोलिस पोहोचले असून तेथे बचाव कार्य सुरू आहे. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.

ANI

@ANI

: Sindhu Sharma, SP Jagtial, says, “45 people have died so far. Injured have been admitted to nearby government hospitals. Rescue operation is underway.” A state-run RTC bus accident had occurred near Kondaagattu, earlier today.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघात झालेल्या बसमध्ये एकूण 63 प्रवासी प्रवास करत होते. त्यातील 45 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 18 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस कोंडागट्टूच्या हनुमान मंदिरहून जगतियालला जात होती. उतरणीचा रस्ता होता आणि वळण घेताना बसचे ब्रेक फेल झाले आणि हा अपघात झाला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button