Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज

जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत पाऊस देणार ओढ

पुणे : देशात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत पाऊस कमी होणार असल्याने शेतकऱ्यांना शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याची चिंता भेडसावण्याची भीती आहे.

स्कायमेट या खासगी संस्थेने यंदाचा मान्सूनबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे. स्कायमेटकडून यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत ९४ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

स्कायमेट या खासगी संस्थेच्या मान्सूनबद्दलच्या प्राथमिक अंदाजानुसार देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस ८५८.६ मिमी सरासरी राहण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तर आणि मध्य भागात पावसाची तूट बघायला मिळण्याचा अंदाज आहे.

गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button