Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ७८८ नवीन कोरोना रूग्ण
![788 new corona patients in last 24 hours in Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/covid-19-1-780x470.jpg)
Covid 19 : देशात कोरोनाचा प्रदुर्भाव दिवसोंदिवस वाढत चालला आहे. अशातच महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांच्या आकड्यामध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ७८८ नवीन कोरोना रूग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ७८८ नवीन कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ४५८७ सक्रिय रूग्ण आहेत. महाराष्ट्रात सध्या कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण १.८२ टक्के आहे. तर पॉझिटिव्हिटी दर ९८.१२ टक्के आहे.
आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना सोशल डिस्टेंसिंग पाळण्याचं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं त्याचप्रमाणे, मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे.