‘त्यांची श्रद्धा अयोध्येत आहे तर आमची श्रद्धा..’; शरद पवारांचे विधान
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार
![Sharad Pawar said that our faith is in farmers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Sharad-Pawar--780x470.jpg)
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांसह मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते अयोध्येत गेले आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
शरद पवार म्हणाले की, हा श्रद्धेचा प्रश्न आहे असं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यांची श्रद्धा अयोध्येत आहे. आमची श्रद्धा शेतकऱ्यांवर आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीशी निगडीत आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसत, संकटातून त्याला मदत कसे करता येईल, यावर आमची श्रद्धा आहे. प्रत्येकाचे धोरण वेगळे असू शकते.
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार आहे. तिथे काँग्रेस सत्तेवर येणार आहे. लोकांना बदल हवा आहे. तो बदल भाजपाला घरी बसवणार आहे, असंही शरद पवार म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अयोध्येत जाणार असल्याने या अयोध्या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.