Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
Covid-19 : भारतात २४ तासांत ६,१५५ नवीन रुग्णांची नोंद
Covid-19 : देशात गेल्या २४ तासांत ६,१५५ नवे रूग्ण आढळूण आले आहेत. यामुळे सक्रिय रूग्णसंख्या ३१,१९४ वर पोहोचली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ५.६३ टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवाडीनुसार, भारतातील COVID-19 ची संख्या आता ४.४७ कोटी (४,४७,५१,२५९) आहे. ११ मृत्यूंसह मृतांची संख्या ५,३०,९५४ वर पोहोचली आहे, ज्यात केरळमधील दोघांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार राष्ट्रीय कोविड-19 रिकव्हरी रेट ९८.७४ टक्के आहे.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ५.६३ टक्के आणि साप्ताहिक सकारात्मकता दर ३.४७ टक्के आहे. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या ४,४१,८९,१११ वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण १.१९ टक्के नोंदवले गेले आहे.