Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

Rahul Gandhi : राहुल गांधी यांना जामीन मंजूर; सुरत सत्र न्यायालयाचा निर्णय

पुढील सुनावणी ३ मे ला होणार

Share On

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये प्रचारादरम्यान सगळे मोदी आडनावाचे लोक चोर आहेत, असं वक्तव्य केलं होतं. त्या प्रकरणी त्यांना सुरतच्या कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर ३० दिवसांची शिक्षा सुनावली होती. त्या तीस दिवसांच्या आत राहुल गांधई यांनी कोर्टात अपील करणं आवश्यक होतं. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ मे ला होणार आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. जर त्या सुनावणीत शिक्षा रद्द करण्यात आली तरच त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल. आता याबाबत नेमकं काय होईल ते ३ मे ला समजणार आहे. राहुल गांधी यांना फक्त जामीन मंजूर होऊन त्यांचं निलंबन मागे घेतलं जाणार नाही. मात्र दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय झाला तरच खासदारकी रद्द होण्याची जी कारवाई आहे त्याचा विचार होईल.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button