प्रशांत पाटील यांचा ‘शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील’ पुरस्काराने सन्मान
![Prashant Patil honored with Education Maharshi Karmaveer Bhaurao Patil Award](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Prashant-Patil--780x470.jpg)
पुणे : खान्देशातील धुळे सारख्या ग्रामीण आदीवासीबहुल भागात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल प्रचिती पब्लिसीटीचे संचालक प्रशांत पाटील यांना खान्देश मराठा पाटील समाज संघातर्फे ‘शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण, पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त प्रतिभा पाटील, खान्देश फेम विनोद कुमावत, राणी कुमावत यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक राहूल कलाटे, मोरेश्वर भोंडवे, उद्योजक दीपक पाटील, मंडळाचे अध्यक्ष महेंद्र पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव शंकर पाटील, मंडळाचे कार्याध्यक्ष उद्योजक शरद पाटील, सहकार्याध्यक्ष पंकज निकम, संचालक मोतीलील भामरे, प्रदीप शिरसाठ, देविदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरी बजावणाऱ्या १३ मान्यवरांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यामध्ये राहुल देसाई – उत्कृष्ठ कार्य गौरव पुरस्कार, डॉ. शीतलकुमार रवंदळे – शिक्षण रत्न पुरस्कार, भुषण पाटील – सामाजिक न्याय भूषण पुरस्कार, प्रशांत पाटील – शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, हिरामण भांमरे – अर्थ भूषण पुरस्कार, हेमंत पाटील – उद्योजक पुरस्कार, देवीदास पाटील – सामाजिक कार्यगौरव पुरस्कार, मनोज पाटील – युवा उद्योजक पुरस्कार, जितेंद्र पाटील – उद्योगरत्न पुरस्कार, रोहिणी पाटील हिला उत्कृष्ठ क्रीडा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच, कार्यक्रमावेळी लकी ड्रॉ द्वारे कुपन विजेत्या महिलांचा पैठणी देवून सत्कार करण्यात आला.