Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय
‘राहुल गांधींवर कसाबप्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’; नितेश राणे
![Nitesh Rane said that Rahul Gandhi should be booked for sedition like Kasab](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Rahul-gandhi-and-nitesh-rane-1-780x470.jpg)
कोल्हापुर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यावरून आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणी आता भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ओबीसींच्या नावाने चुकीचं बोलता, आक्षेपार्ह वक्तव्य करता. मग संसदीय पद्धतीने कारवाई झाल्यावर भाजपच्या नावाने का बोंबलता?, असं नितेश राणे म्हणाले आहेत. ते कोल्हापुरात बोलत होते.
परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधी यांना भारताबाहेर काढून पाकिस्तानला पाठवून द्या. कसाबप्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना भारताबाहेर काढलं पाहिजे, असंही नितेश राणे म्हणाले.