breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
साताऱ्यात शिंदे गटातील माजी नगरसेवकाकडून गोळीबार
दोन जण ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी
सातारा : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात मोरणा खोऱ्यात गोळीबाराचा थरार घडला आहे. यामध्ये दोन जण ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी ठाण्याचा माजी नगरसेवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभराज देसाई यांच्या मतदारसंघात ही घटना घडली आहे. ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक मदन कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जून्या वादातून घटना घडल्याची माहीती मिळाली आहे.
या घटनेत ठार झालेल्यामध्ये श्रीरंग लक्ष्मण जाधव आणि सतीश बाळासाहेब जाधव अशी मृतांची नावे आहेत. जुना वाद मिटवण्याची चर्चा सुरू असताना पुन्हा वादावादी झाली आणि त्यातच रागाच्या भरात मदन कदम यांनी गोळीबार केला.