INDvs AUS : भारतीय संघात मोठा बदल; हार्दिक पांड्याकडे संघाची जबाबदारी
आज रंगणार भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया पहिला वनडे सामना
INDvs AUS : ऑस्ट्रेलियाला कसोटीत भारतीय संघाने २-१ ने पराभूत केलं. आता वनडे मालिकेवर भारतीय संघाची नजर आहे. आजपासून दोन्ही देशांमध्ये वनडे मालिका सुरू होणार आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे. यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे.
पहिल्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा उपस्थित नसल्याने हार्दीक पांड्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांची ही वनडे मालिका असणार आहे. या सामन्याला आज दुपारी 1.30 वाजता सुरुवात होणार आहे.
भारताचा एकदिवसीय संघ :
इशान किशन, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या ( कर्णधार ), केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ :
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अॅलेक्स कॅरी , शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.