Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पुण्यात दहावीचा गणित भाग-१ चा पेपर फुटला?

महिला सुरक्षारक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळले फोटो

पुणे : इयत्ता दहावीची परिक्षा सध्या सुरू आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पेपर फुटण्याची घटना ताज्या असतानाचा पुण्यात दहावीच्या गणित भाग एक चा पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षा रक्षकाने स्वतच्या मोबाईलमध्ये पेपरच्या फोटो आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दहावीच्या परीक्षा केंद्रावर परवानगी नसतानाही हॉलमधील फोटो काढल्याने महिला सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला आहे. १३ मार्च रोजी गणित भाग एक चा पेपर होता. यावेळी विद्यालयातील सुरक्षा रक्षक असलेल्या मनीषा कांबळे यांनी परीक्षा हॉलमध्ये जाऊन पेपरचे फोटो काढले. १५ मार्चला बोर्डाचे पथक तपासणीसाठी विद्यालयात गेले असता आरोपी महिलेवर पथकाला संशय आला.

यावेळी तिच्या मोबाईलची झाडाझडती घेतली असता गणित भाग एक प्रश्न पत्रिकेचे फोटो काढल्याचे समोर आले. महिलेला याबाबत विचारणा केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे अखेर पथकाकडून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button