शीतल म्हात्रेंसाठी तुम्ही विधानसभा बंद पाडली, मग गौतमी पाटील तुमची बहिण नाही का?; ठाकरे गटातील नेत्याचा सवाल
शीतल म्हात्रे ही एकच महिला राज्यामध्ये आहे का?
![Sharad Koli said Gautami Patil is not your sister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Gautami-Patil-and-shital-mhatre-780x470.jpg)
मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडीओवर राज्यातील वातावरण तापलं आहे. अशात नृत्यांगना फेम गौतमी पाटील हिच्याही व्हायरल व्हिडीओचा तपास करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाचे युवा सेना राज्य विस्तारक शरद कोळी यांनी केली आहे.
गौतमी पाटील यांचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. मग ती तुमची बहीण नाही का? शीतल म्हात्रेंसाठी तुम्ही विधानसभा बंद पाडली. मग गौतमी तुमच्या भगिनी नाहीत का? यांना इज्जत नाही का? इज्जत फक्त तुमच्या बरोबर राहणाऱ्या व्यक्तीलाच आहे का? शीतल म्हात्रे ही एकच महिला राज्यामध्ये आहे का? अन्य महिलांवरती अत्याचार होतात त्यावरती राज्य सरकार का लक्ष देत नाही?, असं शरद कोळी म्हणाले.
गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडीओची एसआयटी चौकशी करा. बार्शीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. त्याची पोलीसांनी दखल न घेचल्याने आरोपींनी पोलिसांत तक्रार दिली म्हणून मुलीची बोटं छाटली, त्या आरोपींवर कारवाई करा. माजी भाजप जिल्हाध्यक्षांच्या विरोधात फेसबुकवर रोज एक महिला अत्याचार केल्याची तक्रार करत आहे. त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणीही शरद कोळी यांनी केली आहे.