क्राईम न्यूज : वाकड पोलिसांकडून गांजा विकणाऱ्या आरोपींना अटक
![Wakad police arrested the accused who were selling ganja](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Wakad-police--780x470.jpg)
पिंपरी : वाकड पोलिसांकडून कर्नाटक राज्यातून पुण्यात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून ९ किलो ३०० ग्राम वजनाचा गांजा सह एकूण सात लाख ५२ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड चे आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार अमली पदार्थ विक्री करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या धंद्यावरती कारवाई करण्याबाबत आदेश दिले. त्याच अनुषंगाने वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी आपल्या तपास पथकातील पोलीस संतोष पाटील तसेच तपास पथक अमलदार यांना अमली पदार्थ बाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी पथके तयार करून पेट्रोलिंग करत असताना पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की कर्नाटक राज्यातून गांजाची विक्री करण्यासाठी पुण्यात आलेली कार बिर्ला हॉस्पिटल थेरगाव येथे या परिसरात येणार आहे.
त्याच अनुषंगाने संतोष पाटील यांनी तपास पथकाचा स्टाफ त्या दिशेने वळवला गेला आणि मिळालेल्या माहितीनुसार एक टाटा इंडिका विस्टा कार नं. के ए ५६ एम ०१७९ त्या ठिकाणी उभे असलेली संशयितरित्या हालचाल करीत असल्याने पोलिसांनी त्या गाडीला घेरावा घालून दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. राहुल विठ्ठल जाधव (वय 22 वर्ष) राहणार व्हि. के. सलगर तांडा तालुका कमलापूर जिल्हा गुलबर्गा कर्नाटक, अप्पाराव वाडी (वय 32 वर्ष) राहणार संगमेश्वर या दोन आरोपींना आटक केलं आहे.
तसेच कारची झाडाझडती घेतली असता त्यांना गांजा मिळून आला वाकड पोलीस ठाण्यामध्ये २६६ ऑब्लिक २२३ एन डी पी एस ऍक्ट कलम ८ क २० ब प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन आरोपी कर्नाटक राज्यातून गांजा विक्री करण्याकरिता पुण्यात घेऊन आले असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून आरोपींच्या संपर्कात पुणे व पिंपरी चिंचवड मधील कोण आरोपी आहेत का याबाबत तपास चालू आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/image-17-1024x579.png)