‘व्हॅलेंटाईन डे’ ऐवजी ‘काऊ हग डे’ साजरा करण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना
![Central government instructions to celebrate 'Cow Hug Day' instead of 'Valentine's Day'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/valentines-day-vs-cow-hug-day-780x470.jpg)
दिल्ली : जगभरातील तरुणाई 14 फेब्रुवारी या दिवशी व्हॅलेंटाईन डे साजरा करते. मात्र, याच दिवशी काऊ हग डे.. म्हणजे गाईला आलिंगन दिवस साजरा करण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या अॅनिमल वेल्फेअर बोर्डाने दिल्या आहेत. बोर्डाने तसे पत्रकही काढले आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. या पत्रकात ‘व्हॅलेंटाईन डे’ ऐवजी 14 फेब्रुवारीहा दिवस गाईला आलिंगन दिवस म्हणून साजरा कारावा असे म्हटले आहे.
भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या पत्रकातील निर्देशानुसार, गाय ही एक समृद्ध आणि उपयुक्त पशू आहे. त्यामुळे ती भावनिक समृद्धही आणते. त्यामुळे 14 फेब्रुवारी या दिवशी गाईला आलींगन देऊन हा दिवस साजरा करावा.
मंत्रालयाने विभागीय सचिवांना उद्देशून म्हटले आहे की, पाश्चात्य प्रभावामुळे भारतीय संस्कृतीच्या ऱ्हासाची दखल घेऊन गाईंना मिठी मारण्याचे अवाहन करण्यात आले आहे.