बिचुकलेंच्या अडचणी वाढणार! स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

लहुजी छावा संघटनेच्या वतीने बिचुकलेंविरोधात तक्रार दाखल
पुणे : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी काल कसबा विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी लहुजी संघटनेसोबत त्याचे वाद झाले. त्या वादाच अभिजित बिचुकले यांनी जातीवाचक भाष्य केल्याने त्यांच्याविरोधात स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
लहुजी छावा संघटनेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिजित बीचुकले यांनी कसबा विधान सभाचा उमेदवारीचा अर्ज दाखल केला. त्यात लहुजी संघटनेसोबत त्यांचे वाद झाले. त्या वादात अभिजीत बिचुकले यांनी कोण लहुजी म्हणून उल्लेख केला होता. यामुळे जातीय तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अभिजीत बिचुकले यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी लहुजी छावा संघटनेने केली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, कसबा मतदारसंघ पोटनिडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी बिचुकले यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अर्ज मागे घे आणि पुणे सोडून जा आशा धमक्या येत असल्याचा बिचुकले यानी म्हटलं आहे. यानंतर अभिजीत बीचुकले यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहित पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.




