“रात्रीपर्यंत भाजपच्या कसबा, चिंचवडच्या उमेदवाराची घोषणा होणार”; चंद्रकांत पाटलांची माहिती
![Chandrakant Patil said that BJP's Kasba, Chinchwad candidate will be announced by night](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/chandrakant-patil-4-780x470.jpg)
६ तारखेला सकाळी 11 वाजता कसब्याचा उमेदवार अर्ज दाखल करणार
पुणे : भाजपच्या कसब्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झालेले आहे. या पोटनिवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आता भाजपने रणनीती आखायला सुरुवात केली आहे.
आज भाजपचे नेते व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची बैठक पुण्यामध्ये पार पडली. या बैठकीमध्ये भाजप जो कोणता उमेदवार देईल त्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार या सर्वच घटक पक्षांनी केलेला आहे. ही बैठक संपल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे यावेळी त्यांना उमेदवारी बाबत प्रश्न विचारला असता, भाजपचं केंद्रीय नेतृत्व याबाबत आज रात्रीपर्यंत कसबा आणि चिंचवडच्या उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे, असं म्हटलं आहे.
त्याचबरोबर सहा तारखेला सकाळी 11 वाजता कसब्याचा उमेदवार अर्ज दाखल करेल आणि आणि दुपारी दोन वाजता चिंचवड येथे महायुतीचे सगळ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.