अमित ठाकरेंनी घेतली खासदार छत्रपती उदयनराजेंची भेट
![Amit Thackeray met MP Chhatrapati Udayanraj](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/amit-thackeray-and-udayanraje-bhosale-780x470.jpg)
..तर माझाच मुलगा घरी आल्यासारखं वाटलं- उदयनराजे भोसले
खासदार उदयनराजेंकडून अमित ठाकरेंना Bvlgari men परफ्युम भेट
सातारा : पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे ह्यांनी साताऱ्यात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले ह्यांची सदिच्छा भेट घेतली. ह्या भेटीदरम्यान छत्रपती घराणं आणि ठाकरे कुटुंबायांतील ऋणानुबंध अनुभवता आला तसंच विविध विषयांवर दोघांमध्ये दिलखुलास चर्चा झाली.
साताऱ्यात आलो आणि राजेंना नाही भेटलो असं होऊ नाही शकत. आमच्या घराण्याचे फार जुने संबंध आहेत, त्यामुळे ही स्नेहभेट होती. मला खूप बरं वाटलं कि राजे म्हणाले मुलगा आल्यासारखं वाटलं, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे म्हणाले.
माझ्या मित्राचा मुलगा भेटायला आला.. तर माझाच मुलगा घरी आल्यासारखं वाटलं, असं अमित ठाकरेंच्या भेटीनंतर छत्रपती उदयनराजे म्हणाले.
यावेळी, खासदार उदयनराजे यांनी Bvlgari men हा परफ्युम अमित ठाकरे यांना भेट दिला. तू लहान राहिला नाहीस, मोठा माणुस झाला आहेस. आमच्या सगळ्यांची काळजी घेतली पाहिजेस म्हणुन हा परफ्युम दिल्याचे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.