Indrayani Thadi 2023 : ‘इंद्रायणी थडी’ महोत्सवात महिला भजन महोत्सव उत्साहात संपन्न

‘इंद्रायणी थडी’ महोत्सवात महिला भजनी मंडळाची मोठी उपस्थिती
भोसरी : भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून इंद्रायणी थडी 2023 या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
इंद्रायणी थडी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अनेक कार्यक्रम होते. 26 जानेवारीला महिला मंडळाच्या भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 11 वाजल्यापासून याठिकाणी भजनी मंडळांनी भजन सादर केलं आहे. शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा महेश लांडगे याठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायातील अनेक ज्येष्ठ मंडळी इंद्रायणी थडीला
भेट देत आहेत. इंद्रायणी थडी महोत्सवात प्रत्येक महिला भजनी मंडळास काही मानधन आणि ट्रॉफी देण्यात येत आहे.
अयोध्येत श्रीरामाच्या भव्य मंदिराचे काम सुरू आहे. राम मंदिराच्या धर्तीवर इंद्रायणी थडी महोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.प्रतिकृतीरुपी मंदिरात हा भजन महोत्सव संपन्न झाला.





