ऋषभ पंत आयपीअल खेळणार? प्रशिक्षक रिकी पॉटिंगची प्रतिक्रिया

दिल्ली कॅपिटल्स साठी ऋषभ पंत अत्यंत महत्वाचा
मुंबई : भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा काही महिन्यापुर्वी अपघात झाला. या अपघातात पंतच्या गुडघ्याला तीन लिगामेंट टिअर झाले होते. त्यामुळे तो पूर्णपणे फिट व्हायला बराच काळ लागणार आहे. तो आयपीअल पाठोपाठ वनडे वर्ल्डकपला देखील मुकणार अशी चर्चा सुरू झाली. या दरम्यान दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक रिकी पॉटिंगने प्रतिक्रिया दिली आहे.
ऋषभ पंतची रिप्लेसमेंट मिळणे कठिण आहे. आम्हाला एक विकेटकिपर बॅट्समन हवा आहे. मात्र दिल्ली कॅपिटल्सच्या दृष्टीने ऋषभ पंत अत्यंत महत्वाचा आहे. त्याने याबाबत केलेले वक्तव्य सर्वांच्याच मनाला भावून गेले. मी पंतला माझ्या सोबत डग आऊटमध्ये प्रत्येक दिवस, आठवडे ठेवू इच्छितो. जर तो आयपीएलदरम्यान आमच्यासोबत राहू शकला तर मी त्याला कायम डग आऊटमध्ये ठेवणार. त्याची संघातील उपस्थिती सर्वांना प्रभावित करते, असं रिकी पॉटिंग म्हणाला.
तुम्हाला पंतसारख्या खेळाडूचा पर्याय मिळत नाही. या प्रकारचे खेळाडू झाडाला लागलेले नसतात. आम्हाला याबाबत विचार करावा लागले. आम्ही त्याच्या पर्यायाबाबत विचार करत आहोत. आम्हाला एक विकेटकिपर फलंदाज पाहिजे आहे, असंही रिकी पॉटिंग म्हणाला.




