केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी, कार्यालयात दोन वेळा फोन, पोलिसांनी सुरक्षा वाढवली
![Death threat to Union Minister Nitin Gadkari, two calls to office, police beef up security](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Nitin-Gadkari-1-780x470.jpg)
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्या. आज सकाळी 11.30 वाजता नागपूरच्या खामला भागात असलेल्या नितीन गडकरी यांच्या कार्यालयात त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला. हा फोन दोन वेळा झाला. पहिला कॉल 11:30 वाजता आला, 10 मिनिटांनी दुसरा कॉल 11:40 ला आला. केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाकडून पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. नागपूर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. नितीन गडकरी यांच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदच्या नावाने केंद्रीय मंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयातील लँडलाइन क्रमांकावर कॉल करून जीवे मारण्याची धमकी आली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीने 100 कोटी रुपयांची खंडणीही मागितली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ज्या नंबरवरून कॉल केला होता तो नंबर ट्रेस केला आहे. हा धमकीचा कॉल कर्नाटकातील काही भागातून करण्यात आला होता. आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नितीन गडकरी यांच्या नागपूर कार्यालयाभोवती होणार्या प्रत्येक हालचालीवर सुरक्षा दलाचे जवान लक्ष ठेवून आहेत.