देवेंद्र फडणवीसांविषयी आम्हाला सहानुभूती – संजय राऊत…
नागपूर ः विधिमंडळाचे अधिवेशन वादळी ठरत आहे. विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांना टार्गेट करून त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले जात आहेत. सत्तेतील आमदारांचे घोटाळे लपवण्याकरता भाजपाकडून सारवासारव केली जात आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. आज नागपुरातून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आम्हाला सहानुभूती आहे, असंही राऊत म्हणाले.
‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराला पाठिशी घालण्याचं काम मनापासून करत असतील असं वाटत नाही. त्यांची काहीतरी मजुबरी आहे. त्यांच्यावर हे लादलेलं सरकार आहे. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सहानुभूती आहे आणि हे मी नागपुरातून बोलतोय,’ असं संजय राऊत म्हणाले. सत्ताधाऱ्यांवर आगपाखड करणाऱ्या राऊतांनी देवेंद्र फडणवीसांविषयी सहानुभूती व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळांत आता चर्चेला उधाण आले आहे.
सीमावादाचा ठराव बुळचट
अधिवेशन अजून संपलेलं नाही. सीमाप्रश्नावरचा ठराव अत्यंत महत्त्वाचा आहे. आज याबाबत ठराव होणार आहे. आम्ही यावर बसून चर्चा केली. पण जो ठराव केला आहे तो अत्यंत बुळचट आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीका केली. हा ठराव नसून बेडकांचा डराव आहे, असंही संजय राऊत म्हणाले. We sympathize, with Devendra Fadnavis – Sanjay Raut…
आम्हाला हा प्रदेश केंद्रशासितच करून हवाय
कर्नाटकने ठराव केल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र सरकार आता ठराव आणणार आहे. या ठरावात केंद्रशासित प्रदेशाविषयी काहीच उल्लेख नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोवर सीवादाचा भाग केंद्रशासित करा, अशी आमची आग्रही मागणी आहे. आम्हाला हा प्रदेश केंद्रशासितच करून हवाय, असा पुनुरुच्चार संजय राऊतांनी आज पुन्हा केला. याबाबत उद्धव ठाकरे यांनी काल विधान परिषदेत लक्षवेधी मांडली होती.