बलात्कारप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद फरार
![Non-bailable warrant issued in rape case, former Union Minister of State for Home Swami Chinmayanand absconding](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Chinmaya-nand-Swami.png)
। नवी दिल्ली । महाईन्यूज । प्रतिनिधी ।
माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री स्वामी चिन्मयानंद यांना फरार घोषित करण्यात आले आहे. बलात्कार प्रकरणी अजामीनपात्र वॉरेंट अर्थात NBW जारी असतानाही ते कोर्टात हजर झाले नाही, यामुळे कोर्टाने कलम 82 अंतर्गत कारवाई करत चिन्मयानंद यांना फरार घोषित केले आहे. एमपी- एमएलए कोर्टात त्यांच्याविरोधात केस सुरु आहे.
चिन्मयानंद फरार असल्याची नोटीस त्यांच्या आश्रमावर चिकटवण्यात आली आहे. यानंतरही चिन्मयानंद कोर्टात हजर न झाल्यास त्यांच्याविरोधात कलम 83 अंतर्गत कडक कारवाई केली जाऊ शकते. चिन्मयानंद यांना 16 जानेवारी 2023 ला कोर्टात हजर राहण्याचे आदेश आहेत.
चिन्मयानंद यांच्या शिष्याने 2011 मध्ये त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणानंतर चिन्मयानंद यांच्या वकीलामार्फत त्यांच्या शिष्या आणि त्यांच्या मित्रांवर पाच कोटींचा खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या प्रकरणात केस दाखल होऊ देखील 2022 पर्यंत चिन्मयानंद एकदाही कोर्टात हजर झाले नाही. यामुळे कोर्टाने ही बाब गंभीररित्या घेत चिन्मयानंद स्वामींविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
2017 मध्ये भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर चिन्मयानंद स्वामींविरोधातील खटला मागे घेण्याचे प्रयत्न केले, मात्र कोर्टाने ही केस लोकहितासंबंधीत असल्याचे म्हणत त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
शाहजहांपूरमधील के स्वामी शुकदेवानंद लॉ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एलएलएमच्या विद्यार्थीनीने एक व्हिडीओच्या माध्यमातून स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. हे कॉलेज स्वामी चिन्मयानंद यांच्या ट्रस्टमार्फत चावले जाते. या प्रकरणी स्वामी चिन्मयानंद यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. मात्र या गुन्हापासून ते फरार झाले आहेत.