breaking-newsTOP Newsमुंबई
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर पुर्व येथे डाॅ. प्रदिप कर्णिक यांच्या कादंबरीचे प्रकाशन
मुंबई: शतकोत्तर रौप्य महोत्सवी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आणि मौज प्रकाशन संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदीप कर्णिक यांच्या ‘क्रोधें उत्पाटिला बळें’ या कादंबरीचे प्रकाशन शनिवार दिनांक१७ डिसेंबर२०२२रोजी दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या शारदा मंगल कार्यालयात संध्याकाळी ५ वाजता ख्यातनाम कथा कादंबरीकार भारत सासणे यांच्या हस्ते होणार आहे .
कादंबरीवर ज्येष्ठ अनुवादक चंद्रकांत भोंजाळ , कवयित्री सुनंदा भोसेकर , समीक्षक संशोधक डॉ .नीतीन रिंढे आपले विचार व्यक्त करणार असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखिका राणी दुर्वे करतील .
साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे असं आवाहन ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे आणि श्रीकांत भागवत ,मौज प्रकाशन गृह यांनी केले आहे.