Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वयंसिद्धा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

Share On

पिंपरी: स्वयंसिद्धा प्रतिष्ठान पिं. चिं. पुणे, आयोजित “स्वयंसिद्धा पुरस्कार सोहळा” शनिवार, दि. 17 डिसेंबर 2022, सायंकाळी 5.00 वा., कॅप्टन सदन सभागृह, सावरकर भवन सिंधूनगर, प्राधिकरण, निगडी. येथे होणार आहे. स्वयंसिद्धा पुरस्काराचे यंदाचे सहावे वर्ष आहे. ॲड. प्रार्थना सदावर्ते (कौटुंबीक समुपदेशिका), सरस्वती काळे (पोलीस कॉन्स्टेबल) या पुरस्काराच्या मानकरी आहेत. तसेच या कार्यक्रमात, “स्वातंत्र्य लढ्यातील साहित्यिकांचे योगदान” विषयावरील परिसंवादाचे आयोजन केले आहे.

अंजली कुलकर्णी (ज्येष्ठ साहित्यिका), राजेंद्र घावटे (व्याख्याते, निवेदक), डॉ. धनंजय भिसे ( लेखक, सामाजिक कार्यकर्ते ) इत्यादी मान्यवर मंडळी परिसंवादाचे वक्ते आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा. तुकाराम पाटील (जेष्ठ साहित्यिक), कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. पुरुषोत्तम सदाफुले (ज्येष्ठ साहित्यिक) ही मान्यवर मंडळी आहेत. अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button