… चक्क अधिका-यांच्या केबिनमध्ये सोडले डूक्कर ; शिवसेना नगरसेवकांचे आंदोलन
शहरात मोकाट कुत्री, डूक्करांचा हैदोस
पिंपरी ( महा ई न्यूज ) – थेरगांवसह परिसरात डूक्करांचा उपद्रव्य वाढला आहे. या उपद्रव्यामूळे नागरिकांना त्रास होवू लागला आहे. महापालिका पशुवैद्यकीय विभागाकडून अद्याप डूक्कर, कुत्री पकडण्याचा बंदोबस्त केला जात नाही. त्यांच्या निषेधार्थ शिवसेना नगरसेवक अॅड सचिन भोसले यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. के. अनिल राॅय यांच्या केबिनमध्ये डुक्कर सोडून महापालिका प्रशासन व्यवस्थेचा निषेध व्यक्त केला.
भोसले म्हणाले की, महापालिका हद्दीतील थेरगाव, गणेशनगर, गुजरनगर, मंगलनगर, वाकड रोड या परिसरात डुक्करांचा सुळसुळाट आहे. डुक्करांच्या त्रासाने नागरिक त्रस्त झाले आहेत. सर्व डुक्करांचा बंदोबस्त करा, याकरिता महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांना निवेदन दिले होते. तरीही त्याकडे संबंधित अधिका-यांनी दुर्लक्ष केले. याविषयी प्रभागातील नागरिकांच्या तक्रारी वारंवार येवू लागल्याने पशुवैद्यकीय अधिका-यांच्या निषेधार्थ हे आंदोलन केले आहे.
प्रभाग क्रमांक 24 मधील थेरगावसह परिसरात सुमारे 300 ते 500 लहान मोठी डुक्करे आहेत. त्यांच्या उपद्रवाने नागरिक भयंकर त्रास होत आहे. महापालिकेने डुक्कर पकडण्यासाठी संस्था नेमली होती. परंतू, त्या संस्थेकडून डुक्कर पकडून कोठे सोडली, याविषयी आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे प्रभागातील डुक्करांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि प्रशासनाला जागे करण्याच्या निषेधार्थ जिवंत डुक्कर अतिरिक्त आयुक्त, आरोग्य वैद्यकीय अधिका-यांना भेट दिल्याचे, नगरसेवक अॅड सचिन भोसले यांनी सांगितले.