Breaking-newsमनोरंजन

आजच्या महिलांनी भयमुक्‍त असायला हवे: करीना

करीना कपूरने नेहमीच नायिकांच्या निकषांना छेद देणारे रोल केले आहेत. “चमेली’, “अशोका’ आणि “जब वुई मेट’ सारख्या रोलमुळे तिला नायिकांमधील बंडखोर अभिनेत्री केले. आजच्या महिलांनीही असेच बंडखोर आणि भयमुक्‍त असायला पाहिजे, असा तिचा आग्रह आहे. आपले जीवन जगताना घाबरून, लाजून जगता येऊ शकणार नाही. आजच्या काळात महिला घाबरून राहिल्या तर त्यांना आपल्या आयुष्याचा आनंद घेता येणार नाही, असे ती म्हणते. मात्र आपल्याला कोणी विनाकारण बंडखोर म्हणू नये असेही ती म्हणाली. ग्लॅमर्स लुकमध्ये ती जेवढी आकर्षक दिसते तशीच मेक अपशिवायही आकर्षक असल्याचा तिचा दावा आहे.

मेकअप एखादीला सुंदर बनवतो. पण महिलेजवळ आपण सुंदर असल्याचा आत्मविश्‍वास असणेही तितकेच गरजेचे आहे, असे ती म्हणाली. “वीरे दी वेडिंग’मध्ये बिनधास्त रोल साकारणारी करीना लवकरच अक्षय कुमारबरोबर एका सिनेमात दिसणार आहे. तर दुसरीकडे करण जोहरच्या “तख्त’मध्ये करीना रणवीर सिंह, अलिया, भूमी पेडणेकर आदींबरोबर दिसणार आहे. आपल्या बिनधास्त ऍप्रोचमध्ये ती याही रोलला सामोरी जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button