TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई
अनिल देशमुखांनंतर सचिन वाझे यांनाही जामीन; मात्र सुटका नाही
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आरोपी असलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनाही विशेष न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. मात्र वाझे हे भ्रष्टाचारप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यात आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात अटकेत असल्याने जामीन मिळूनही त्यांना कारागृहातच राहावे लागणार आहे. गैरव्यवहाराच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आपलीही जामिनावर सुटका करावी, अशी मागणी वाझे यांनी विशेष न्यायालयाकडेकेली होती.





