सुषमा अंधारेंचा षटकार ः मुख्यमंत्री घरी-मंत्रालयात नसतात, पण वेळ मिळाल्यावर गुवाहाटीला जातात
कोल्हापूर । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
कोरोनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून होते. तो काळच असा होता की घरात बसून राहणं गरजेचं होतं. त्या विषाणूची पूर्वअटच अशी होती की एकमेकांशी संपर्क टाळला पाहिजे. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून राहायचे. पण आताचे मुख्यमंत्री घरात नसतात. ते घराबाहेर असतात, म्हणजे कुठे असतात? ते घराबाहेर असतात म्हणजे मंत्रालयातही नसतात, असा सणसणीत टोला सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना लगावला आहे. त्या आज कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलत होत्या.
मुख्यमंत्री घरात नसतात, घराबाहेर असतात. इतके बाहेर असतात की त्यांना सलाईन लावावं लागतं. ते घराबाहेर असतात म्हणजे कुठे असतात? ते घराबाहेर असतात म्हणजे मंत्रालयात नसतात. ते गणपतीची आरती करत असतात. दांडिया खेळायला जातात. श्राद्धाचं जेवायला जातात. दिल्लीला हुजरे मुजरे करायला जातात. त्यातून वेळ मिळाला की ते गुवाहाटीला कामाख्याला जातात. घरात नसतात. आता तुम्हीच ठरवा तुलनात्मक तुम्हाला कोण हवंय? असा सवालही सुषमा अंधारे यांनी यावेळी उपस्थित केला.




