ग्रामीण डाकसेवकांना स्मार्ट करणार…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Postal-Payment-Bank-6.jpg)
नवी दिल्ली – भारतीयांसाठी नेहमी आदराची व्यक्ती राहिलेल्या पोस्टमनवर ग्रामीण नागरिकांचा दृढ विश्वास आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनानंतरही पोस्टमनवरील विश्वास कायम राहिलेला आहे. चालू असलेल्या संस्था आणि संरचनामध्ये काळानुसार बदल केला जाणार आहे.
देशात आज 1.5 लाख टपाल कार्यालये आणि तीन लाखांच्यावर ग्रामीण डाक सेवक आहेत. या ग्रामीण डाकसेवकांना स्मार्ट फोन आणि डिजिटल साधने देऊन त्यांना वित्तीय सेवा पुरवणारे सहाय्यक बनवले जाईल.
“आयपीपीबी’मुळे पैशांचे हस्तांतरण, सरकारी मदतीचे हस्तांतरण, देयके भरणे आणि गुंतवणूक तसेच विमा सेवा या सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील. आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पोस्टमन या सेवा लोकांच्या घरांपर्यंत पोहोचवतील. आयपीपीबीमुळे डिजिटल व्यवहारही सोपे होतील आणि प्रधानमंत्री पिक विमा योजना यांसारख्या योजनांचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे शक्य होईल.
वित्तीय क्षेत्रात बेजबाबदार कर्ज वितरणामुळे उद्भवलेल्या विविध समस्यांचा आणि अडचणींचा हे सरकार 2014 पासून कठोरपणे सामना करत आहे. या सर्व कर्जांचा पुनर्विचार करण्यात येत आहे आणि बॅंकिंग क्षेत्राला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे, असेही पंतप्रधानांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.